मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्या
रेल्वे प्रशासनाचा निर्णय ; प्रवाशांना मोठा दिलासा
भुसावळ : रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस प्रयागराज दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मुंबई -जबलपुर गरीबरथ विशेष गाड़ी या विशेष पूर्णपणे आरक्षित गाड्या असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज विशेष (द्वि-साप्ताहिक)
गाडी क्रमांक 02129 डाउन विशेष 4 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवार आणि रविवारी 05.23 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी प्रयागराजला 08.50 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 02130 अप विशेष 5 पासून प्रयागराज येथून दर सोमवारी आणि बुधवारी 18.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 21.30 वाजता पोहोचेल. थांबे : इगतपुरी व निवारी वगळता नियमित गाडी क्रमांक 22130/22129 नुसार थांबे समान असतील. संरचनाः 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 12 शयनयान, 3 द्वितीय आसन श्रेणी. थांबे – कल्याण , नासिक , मनमाड , , भुसावल ,बुरहानपुर , खंडवा. आरक्षण : 02129 विशेष ट्रेनचे बुकिंग 2.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि ुुु.ळीलींल.ले.ळप या वेबसाइटवर सुरू होईल.

लोकमान्य टिळक टर्मिनस- प्रयागराज दुरांतो विशेष (द्वि साप्ताहिक)
गाड़ी क्रमांक 02293 डाउन दुरांतो विशेष 2 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी व शुक्रवारी दुपारी 17.25 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी प्रयागराजला 12.45 वाजता पोहोचेल. गाड़ी क्रमांक 02294 अप दुरांतो विशेष 3 पासून प्रयागराज येथून दर मंगळवार आणि शनिवारी 19.20 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 14.55 वाजता पोहोचेल.
थांबे : इगतपुरी वगळता नियमित गाडी क्रमांक 12293 / 12294 नुसार थांबे समान असतील. संरचनाः 1 प्रथम वातानुकूलित, 3 द्वितीय वातानुकूलित, 13 तृतीय वातानुकूलित श्रेणी. आरक्षण : 02293 विशेष ट्रेनचे बुकिंग 01.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि ुुु.ळीलींल.ले.ळप या वेबसाइटवर सुरू आहे.
जबलपू-मुंबई गरीबरथ विशेष गाड़ी
गाड़ी क्रमांक – 02187 अप जबलपुर – मुंबई गरीबरथ विशेष गाड़ी ही दिनांक – 3 पासून दर सोमवार ,बुधवार ,शनिवार ला प्रस्थान स्टेशन हुन 19.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी मुंबई येथे 12.20 वाजता पोहोचेल. गाड़ी क्रमांक – 02188 डाउन मुंबई – जबलपुर गरीबरथ विशेष गाड़ी ही दिनांक – 4 पासून दर मंगळवार ,गुरुवार, रविवारी प्रस्थान स्टेशनहुन 13.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी जबलपुर येथे 05.55 वाजता पोहोचेल.थांबे – दादर , कल्याण , नासिक , मनमाड , जळगाव , भुसावळ , खंडवा, हरदा , इटारसी , पिपरिया , गाडरवारा ,नरसिंगपुर. संरचनाः 15 तृतीय वातानुकूलित श्रेणी. आरक्षण : 02188 विशेष ट्रेनचे बुकिंग 2.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि ुुु.ळीलींल.ले.ळप या वेबसाइटवर सुरू होईल. फक्त कन्फर्म टिकट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

