रावेर महसुलच्या उद्दिष्टात वाढ


सात कोटींच्या उद्दिष्ट पूर्तीनंतर आता दहा कोटींचे उद्दिष्ट : थकबाकी भरण्याचे आवाहन

रावेर : महसूल विभागाकडून तालुक्यातील शेतकरी व नागरीकांकडे थकबाकी असलेला महसूल कर जमिनीचे, शेती, बिनशेती, गौणखनिज, वर्ग दोन मधील जमिनीची बेकायदेशीर झालेले व्यवहार शोधून त्यांचा नजराणा वसूल करणे अशा विविध माध्यमातून रावेर तहसील कार्यालयाला महसूल वसुलीचे या आर्थिक वर्षासाठी 10 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्यावर्षी दिलेले सात कोटी रुपयांचे उद्दिष्ट तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के पूर्ण करण्यात आले होते. यंदा या उद्दिष्टात तीन कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली असून ते आता दहा कोटी रुपये देण्यात आले आहे. महसूल कर वसूल करून तो देखील पूर्ण करण्याचे आमचे लक्ष असून जनतेने व शेतकर्‍यांनी सहकार्य करण्याचे अवाहन निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी केले आहे.

महास्वराज्य अभियान राबविणार
शासनाला शंभर टक्के वसूल करून द्यायचा असल्यामुळे महसूल विभागाचे सर्व कर्मचारी कामाला लागले आहेत. महास्वराज्य अभियानांतर्गत नजराणा वसुलीसाठी ज्या शेतकरी किंवा नागरीकांची वर्ग दोन शेती, प्लॉटची जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्रीचे व्यवहार केलेले आहे अशांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याबाबतचे प्रकरण शोधून त्यांच्याकडून नजराणा वसूल केला जाणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे म्हणाले.

शेतकर्‍यांना फिरवू नका ; तलाठ्यांना सूचना
संजय तायडे म्हणाले की, शेतकर्‍यांना किंवा प्लॉट धारकांना नोटीसा बजावण्यात येणार असून त्यांनी कर न भरल्यास त्यांच्या जमिनी व प्लॉट्स शासन दरबारी जमा करणार असल्याच्या सूचना तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी बैठकीत सर्व मंडळधिकारी आणि तलाठी यांना केल्या आहेत. लोकांच्या शेती-प्लॉट संदर्भातील नोंदी वेळेच्या वेळी कर, शेतकर्‍यांना फिरवा-फिरव करू नका, शेतकर्‍यांच्या तक्रारी येऊ देऊ नका, त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !