लग्नाच्या आमिषाने विधवा महिलेवर अत्याचार : जळगावच्या वेंडरावर गुन्हा


जळगाव : लग्नाच्या आमिषाने 30 वर्षीय विधवा महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जळगावातील वेंडर अक्षय गंगाधर जोशी याच्याविरुध्द रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेच्या पतीचे 3 जुलै 2017 रोजी निधन झाले असून संशयीत आरोपी अक्षय जोशी हा तहसील कार्यालयात वेंडर असून दोघांमध्ये ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. विधवा असल्याने जोशी याने पीडितेशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यातून त्याने वेळोवेळी पीडितेवर अत्याचार केले. दरम्यान जोशी याने अनेक महिलांना फसविल्याची माहिती पीडीतेला कळाल्यानंतर तिने त्याच्यापासून संपर्क कमी केला. 24 ऑगस्ट रोजी अक्षय पीडितेच्या घरी आला व त्याने तिला मला शारीरीक संबंध ठेवू न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केले. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे करीत आहेत.


कॉपी करू नका.