भुसावळातील गुन्हेगारी थोपवण्यासाठी आयपीएस अधिकारी द्या
शिवसेनेतर्फे भुसावळ शहरात स्वाक्षरी मोहिम : गृहमंत्र्यांसह पदाधिकार्यांना निवेदन
भुसावळ : भुसावळ शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी शहरात आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्यासह नमा शर्मा, मिलिंद कापडे, धीरज वाढोणकर, विजय घोरपडे यांनी करीत या मागणीसाठी शहरात स्वाक्षरी मोहिम राबवली. या संदर्भात स्थानिक प्रशासन मुख्यमंत्री, गृह मंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकारी आदींना निवेदन पाठवण्यात आले.
भुसावळात वाढली गुन्हेगारी
निवेदनाचा आशय असा की, भुसावळ शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून सर्वसामान्य नागरीकांना जगणे कठीण झाले आहे. लुटमार वा छेडखानी कधी होईल किंवा अचानक कधी हाणामारी होऊन कोणाचा खून होईल? याचा भरवसा नाही. गुन्हेगारांवर कारवाई केली तर त्या पोलीस कर्मचार्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवले जाते शिवाय महिलावर्ग, शाळकरी मुली यांना धमकावले जाते तसेच ब्लॅकमेल केले जात असून अल्पवयीन लहान मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. गुन्हेागारीचा बीमोड होण्यास शहरात शांतता प्रस्थापीत होण्यासाठी आयपीएस अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, या मागणीसाठी सोशल डिस्टन्स व नियमांचे ालन करून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.


