बंधन बँकेच्या वसुली कर्मचार्‍याचा बनाव उघड : स्वतःच केली सव्वा लाखांची लूट


जामनेर : बंधन बँकेच्या वसुली कर्मचार्‍याने स्वतःच सव्वा लाखांची रक्कम लांबवत आपल्याला दरोडेखोरांनी लुटले असल्याचे पोलिसांना सांगितले होते मात्र पोलिस तपासात तक्रारदार हाच आरोपी निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी वसुली कर्मचारी हितेश रामेश्वर देशमुख (रा. पारळ, ता.भोकरदन, जि.जालना) यास अटक करण्यात आली आहे.

वसुली कर्मचारी अखेर गजाआड
गारखेडा (ता. जामनेर) येथून बँकेच्या कर्जदाराकडून वसुलीचे सव्वालाख रुपये घेवून देशमुख हा येत असताना आपला दरोडेखोरांना पाठलाग करीत दुचाकी खाली पाडून आपल्या ताब्यातील सव्वा लाखांची रोकड लांबवल्याचे देशमुख याने पोलिसांना सांगितले होते मात्र पोलिस चौकशीत तक्रारदार खोटा बोलत असल्याचे निष्पन्न झाले तर देशमुख याच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !