भुसावळचे माजी नगरसेवक शेख साबीर यांचा सत्कार


भुसावळ : संविधान बचावो समिती व मुस्लीम नुमांईंदा कौन्सीलतर्फे भुसावळचे माजी नगरसेवक शेख साबीर यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. कोरोना महामारी काळात सामाजिक कार्यात विशेष भूमिका निभावणार्‍या पदाधिकार्‍यांचा समितीचे अध्यक्ष सलीम शेठ चुडीवाले, मुस्लिम नुमांईंदा कौन्सीलचे अध्यक्ष फरान खान व सदस्यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. यात भुसावळचे माजी नगरसेवक शेख साबीर, मजदुरांना मदत करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या मो.मुन्वर खान, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, युनूस मामा, इब्राहीम खान उर्फ राजा, सद्दाम खाटीक, रऊफ ठेकेदार, ईम्रान खान, हाजी अंसार खान आदींचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी समाजासाठी कार्य करणार्‍या वकीलांचाही गौरव करण्यात आला. त्यात अ‍ॅड.मतीन अहमद, अ‍ॅड.वसीम खान, अ‍ॅड.मिर्झा, अ‍ॅड.एहतेश्याम मलिक, अ‍ॅड.परवेज अहमद, अ‍ॅड.वसीम खान आदींचा समावेश होता. सा.बां.विभागाचे अधिकारी शेख ईम्रान शेख यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी एमआयएमचे फिरोज शेख, दानीश पटेल, हनीफ सर, रऊफ ठेकेदार, फुरकान अहमद, ईमरान खान, जुनेद खान, अशरफ कुरैशी, अशफाक भाई, नाजीम शाह, इकबाल पिंजारी आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !