भुसावळ विभागाच्या सहा.अधीक्षकपदी कुमार चिंथा


भुसावळ : भुसावळ विभागाच्या सहा.अधीक्षकपदी कुमार चिंथा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन तुळशीराम राठोड यांची नवी मुंबई सहाय्यक आयुक्तपदी बदली झाल्यानंतर हे पद रीक्त असल्याने तात्पुरता पदभार कुमार चिंथा यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मंगळवारी चिंथा यांनी भुसावळ शहरातील तालुका, बाजारपेठ पोलिस ठाण्यांना भेट देत अधिकार्‍यांकडून प्रलंबित गुन्ह्यांसह भौगोलिक क्षेत्राची माहिती जाणून घेतली. बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांनी त्यांचे स्वागत केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !