कृषि विधेयक स्थगितीच्या आदेशाची होळी


रावेरात भारतीय जनता पार्टीतर्फे राज्य सरकारचा निषेध; तहसीलदारांना निवेदन

रावेर : शेतकर्‍यांना सन्मान प्राप्त करून देणारे कृषी विधेयक केंद्र सरकारने लागू केल्यानंतर राज्य सरकारने या अध्यादेशाला महाराष्ट्रात स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणार्‍या राज्य सरकारचा भारतीय जनता पक्षातर्फे निषेध करण्यात आला असून या स्थगिती आदेशाची पक्षातर्फे बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर होळी करण्यात आली. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे कृषी विधेयक मंजूर केले असून याबाबत तसा अध्यादेश काढला आहे. मात्र राज्य सरकारने या अध्यादेशाला स्थगिती दिली असल्याने शेतकर्‍यांचे स्वातंत्र्य यामुळे हिरावले जाणार आहे. शेतकर्‍यांबद्दल बेगडी प्रेम असणारे सत्ताधारी काँग्रेस व इतर पक्ष या विधेयाकाबद्द्ल अपप्रचार करीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षातर्फे या कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती देणार्‍या आदेशाची पक्षातर्फे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर होळी करीत राज्य सरकारविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना यावेळी पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय धांडे, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील, महेश चौधरी, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, पंचायत समिती उपसभापती जुम्मा तडवी, महिला तालुकाध्यक्ष रेखा बोंडे, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, शहराध्यक्ष दिलीप पाटील, संदीप सावळे, वासुदेव नरवाडे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !