दोंडाईचा सहा.निरीक्षक पंजाबराव राठोड यांची नियंत्रण कक्षात बदली
तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिस अधीक्षकांची कारवाई : आनंद कोकरे यांची नियुक्ती
धुळे : दोंडाईचा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सायबर सेलचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दोंडाईचा शहरात मोहन मराठे (37) या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूू झाल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण आहे तर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़ मोहन मराठे याच्यावर धुळ्यात सकाळी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

