भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी तक्रारदाराला केला मोबाईल परत
भुसावळ : लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा निष्पन्न गेल्यानंतर तक्रारदारास न्यायालयाच्या आदेशाने मोबाईल परत केला आहे. तक्रारदार राजकुमार कोराणे (अमळनेर) हे 31 डिसेंबर 2019 रोजी पुरी-अजमेर एक्स्प्रेसने बडनेरा ते अमळनेर असा प्रवास एस- 1 कोचमधून प्रवास करीत असताना जळगाव येथून गाडी सुरू होताच त्यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी अयुब अली असगर अली सय्यद (आव्हाने, जि.जळगाव) यास अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला होता. लोहमार्ग न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी तक्रारदाराला हा मोबाईल परत करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बबन शिंदे यांनी केला.

