दुबईच्या महिलेची ईटारसी स्थानकावरून चोरट्यांनी पर्स लांबवली


भुसावळ- अप 11056 गोदान एक्स्प्रेसमधून आझमगढ ते कुर्ला प्रवास करणार्‍या दुबईस्थित महिला प्रवशाची चोरट्यांनी पर्स लांबवली. इटारसी स्थानकाजवळ सोमवारी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. पर्समध्ये मोबाईलसह रोख रक्कम मिळून 23 हजार रुपयांचा होता. गोदान एक्स्प्रेसच्या ए-1 या डब्यातील बर्थ क्रमांक 47 वरून अबू नूर हसान तालीब (रा.रौनानार, आझमगढ) व त्यांच्या पत्नी शबाना प्रवास करीत होत्या. सोमवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास इटारसी रेल्वे स्थानकावरून गाडी सुटताच शबाना यांच्या झोपेचा फायदा चोरट्यांनी घेत एक हजार रुपये किंमतीची पर्स चोरून व त्यातील 18 हजारांचा मोबाईल तसेच चार हजारांची रोकड मिळून 23 हजारांचा मुद्देमाल लांबवला. तिकीट निरीक्षकाकडे तक्रार दिल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार रामनारायण उपाध्याय यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. हा गुनहा इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.


कॉपी करू नका.