यावल नूतन तहसीलदारांचे पोलिस निरीक्षकांनी केले स्वागत


यावल : नूतन तहसीलदार महेश पवार यांचे यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांची भेट घेवून स्वागत केले. या अर्ध्या तासाच्या औपचारीक स्वागताच्या निमित्ताने झालेल्या भेटीत यावल तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्य परीस्थितीबाबत आढावा तहसीलदारांनी जाणुन घेतला त्याचबरोबर तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याशी वाद घालणार्‍या पुंडलिक बारी यास अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही ? याबाबत पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याशी माहिती जाणून घेतली असता आरोपीचा कसून शोध सुरू असून लवकरच त्यास अटक करू, असा विश्‍वास धनवडे यांनी व्यक्त केला. शेतकरी आत्महत्या प्रकरणा संदर्भात विविध अडचणी येत असल्याचे दिसून येत असून तपासकामात परीपुर्ण माहितीचा अभाव दिसुन येत असल्याने प्रशासनाने सखोल चौकशीअंती शेतकरी आत्महत्याचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवावे जेणेकरून खर्‍या अन्नदात्यांवर अन्याय होणार नाही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !