भुसावळ तालुका पोलिसांची मास्क न लावणार्यांवर धडक कारवाई
भुसावळ : तालुक्यात चोरवड नाका आणि कुर्हा गावाजवळ तालुका पोलिसांनी केलेल्या नका बंदीत मास्क न लावणार्या दहा मोटरसायकलस्वारां विरुद्ध पोलिसांनी प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज सकाळी आणि सायंकाळी नाकाबंदी लावली जात आहे. शनिवारी सायंकाळी 5 ते 7 वाजे दरम्यान करण्यात आलेल्या नाकाबंदी 10 मोटरसायकलस्वारांनी तोंडाला लावल्याने पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि त्यांच्या सहकार्यांनी मोटरसायकलस्वारांविरुध्द दंडात्मक कारवाई केली. 200 रुपये दंड करीत पुन्हा भविष्यात विना मास्कने फिरल्यास प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्याची समज देण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यापासून दररोज तोंडाला मास्क न लावणार्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे, आठवडाभरात तालुका पोलिसांनी सुमारे 110 वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्याचे निरीक्षक कुंभार म्हणाले.

