सुनेच्या विरहात सासुचाही ओढवला मृत्यू


साकेगावातील घटना : शस्त्रक्रियेनंतर सुनेच्या मृत्यूची वार्ता ऐकताच सासुलाही आला हृदयविकाराचा तीव्र झटका

भुसावळ : शस्त्रक्रियेदरम्यान सूनेचा मृत्यू ओढवल्यानंतर सुनेच्या विरहात सासूचाही मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील साकेगावात घडली.
रंजनाबाई सुरेश मनोरे (48) यांना पोटातील त्रासामुळे पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता शस्त्रक्रियेदरम्यान रंजनाबाई यांचा 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. याची माहिती संध्याकाळी सासुबाई मिराबाई गोविंदा मनोरे (65) यांना कळताच त्यांची तब्येत अचानक बिघडली व सुनेच्या निधनाचे दुःख व विरह सहन न झाल्यामुळे 11 रोजीच्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास मिराबाई यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचीही प्राणज्योत मालवली. रविवारी पुणे येथून सुनबाई मिराबाई यांचा रुग्णवाहिकाणे मृत्यूदेह गावात आणल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सासू-सुनेच्या मृत्यूदेहावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !