भोलाणे तापी नदीलगत चार गावठी दारुच्या अड्डे उद्ध्वस्त


तालुका पोलिसांच्या कारवाईने उडाली खळबळ

जळगाव : तालुक्यातील भोलाणे येथील तापी नदीच्या काठालगत सुरु असलेल्या चार हातभट्टी दारूच्या अड्डयावर रविवारी पहाटे तालुका पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 62 हजार रुपये किमतीचे रसायन व 4800 रुपये किंमतीची गावठी दारु असा एकूण 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाईने उडाली खळबळ
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भोलाने येथील तापी नदीच्या काठच्या जंगलात बेकायदेशीर गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू पाटील, दिपक कोळी, सुशील पाटील, सुधाकर शिंदे यांनी रविवारी सकाळी 5 ते 8 वाजेच्या दरम्यान नदी काळालगत चार ठिकाणी सुरू असलेली गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यात 62 लोखंडी व प्लास्टीक ट्रम, 200 लिटरचे 6 हजार 200 रू पये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन व 120 लिटर 4 हजार 800 रुपयांची गावठी दारू असा एकुण 62 हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आहेत. दारु निर्मिती करणार्‍यांचा तालुका पोलीस शोध घेत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !