राष्ट्रवादी प्रवेशाबाबत माजी मंत्री खडसे म्हणाले, अद्याप वेळ आली नाही


भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असतानाच माजी मंत्री खडसे हे नुकतेच मुंबईतही जावून आल्याने राज्यभरातील खडसे प्रेमींना खडसेंच्या निर्णयाबाबत उत्सुकता आहे. भुसावळात सोमवारी रस्ता कामांच्या शुभारंभप्रसंगी खडसे आले असता त्यांना माध्यमांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत छेडले असता त्यांनी अद्याप वेळ आली नसल्याचे सूचक वक्तव्य करीत शेवटी जय श्रीरामचा नाराही लगावला त्यामुळे खडसे आता खरोखर भाजपा सोडणार की त्याबाबत नुसत्याच चर्चा सुरू राहणार याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !