वरणगावात उद्या मोफत आरोग्य निदान शिबिर
आरोग्य तपासणीसह मूळव्याध व व्यसनमुक्ती मिळणार सल्ला
वरणगाव : शहरात मंगळवारी सकाळी दहा वाजता लहान मुलांसह महिलांसाठी आरोग्य शिबिर तसेच मूळव्याध व व्यसनमुक्ती यावर सल्ला देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली, भुसावळ यांच्यावतीने एक दिवसाचे शिबिर होणार आहे. बसस्थानक चौकातील गणपती हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता भुसावळ येथील किलबिल हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ प्रहिज फालक हे लहान मुलांच्या विविध आजारांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करतील तसेच महिला आरोग्य निदान व व्यसनमुक्ती याबाबत भुसावळ येथील अध्ययन पॅरामेडिकल हॉस्पिटल व कॉलेजचे संचालक डॉ.वंदना वाघचौरे या मार्गदर्शन करतील.
यांची राहणार उपस्थिती
या शिबिरात गणपती हॉस्पिटलचे डॉ.पी.व्ही.पाटील मदत करतील. वरणगाव शहर परीसरातील गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, वरणगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे, प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर, प्रोजेक्ट चेअरमन विकास पाचपांडे, सुनील वानखेडे, जीवन महाजन, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, समाधान जाधव, बापू चौधरी, राजेंद्र परसे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल. या शिबिराच्या नियोजनासाठी गणपती हॉस्पिटल येथे बैठक झाली. या बैठकीवेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून योग्य त्या खबरदारी घेण्यासाठी चर्चा करण्यात आली.


