रेल्वे प्रवाशाला मोबाईल केला परत


भुसावळ : 02141 पाटलीपुत्र एक्स्प्रेस ठाणे ते जळगाव असा प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचा घाईत मोबाईल बर्थवर राहून गेल्यानंतर त्यांनी जळगाव येथे लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसांना सूचित करण्यात आले त्यांनी लागलील दखल घेत गाडी भुसावळात आल्याने संबंधित बोगीची पाहणी केल्यानंतर संबंधित प्रवाशाचा मोबाईल बर्थवर आढळल्यानंतर तो संबंधित प्रवाशाला परत केला.

प्रामाणिकपणा अद्यापही जिवंत
झाले असे की, प्रवासी संजय जंजाळकर (ओम साई, 78 भवानीनगर, भांडुप, पूर्व मुंबई) हे 10 रोजी वयोवृद्ध आईसोबत पाटलीपूत्र एक्सप्रेसने प्रवास करीत असताना जळगावात घाई-घाईत बोगी क्रमांक आठमधील बर्थ क्रमांक 28 वर मोबाईल राहून गेला. त्यांनी जळगाव लोहमार्ग पोलिसांनी ही माहिती कळवल्यानंतर भुसावळात गाडी आल्यानंतर पोलिस हवालदार सुधीर पाटील व महिला पोलीस नाईक अर्पणा गेडाम यांनी तत्परता दाखवून मोबाईलचा शोध घेतला व नंतर लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी संबंधित प्रवाशास मोबाईल परत करीत सतर्क कर्मचार्‍यांचा गौरवही केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !