कन्हाळ्यात जुगाराचा डाव उधळला : पाच आरोपी जाळ्यात


भुसावळ : तालुक्यातील कन्हाळा बु.॥ शिवारातील मोतीराम नगरात जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकत पाच जुगार्‍यांच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून बावन्न पत्त्यांचा कॅट तसेच एक हजार 750 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी योगेश सुभाष चव्हाण, शांताराम धोंडीराम जाधव, शंकर भगवान महाजन, सुकलाल काशीराम सपकाळे, संजय राजधार कोचुरे (रा.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार विठ्ठल फुसे, जगदीश भोई , प्रवीण पाटील, होमगार्ड कमलाकर महाजन आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !