राज्यातील मंदिरे खुली करा


भुसावळ विभागात भाजपा पदाधिकार्‍यांचे आंदोलन

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मंदिरे महाविकास आघाडी सरकारने बंद केली असल्याने राज्य सरकारचा निषेध करीत मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे भुसावळ विभागातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात आंदोलन करण्यात आले. रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर येथील मंदिरासमोर मंदिर बंदच्या विरोधात लाक्षणिक उपोषण करण्यात आले तर मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावी संत मुक्ताबाई मंदिर आवारात आंदोलन करण्यात आले.

ओंकारेश्‍वर मंदिरात लाक्षणिक उपोषण
रावेर : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपातर्फे तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकारेश्वर मंदिरावर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका सरचिटणीस सी एस.पाटील, महेश चौधरी, पंचायत समितीचे सभापती जितू पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, शहराध्यक्ष दिलीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन, विशाल पाटील, महिला तालुकाध्यक्ष रेखा बोंडे, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, अमोल पाटील, यशवंत चौधरी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मुक्ताई मंदिरात खासदारांच्या उपस्थितीत आंदोलन
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे आणि देवस्थानने उघडावीत यासाठीमुक्ताबाई मंदिरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा निषेध करीत तात्काळ देवस्थाने उघडण्याची मागणी केली. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले व नंतर आता अनलॉकमध्ये दुकाने, शासकीय कार्यालयांसोबतच दारूची दुकाने आणि हॉटेल देखील उघडण्यात आले आहे मात्र अद्यापही धार्मिक स्थळे व देवस्थाने बंद असल्याने भाजपातर्फे मंगळवारी रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिर आवारात आंदोलन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार रक्षा खडसे, बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, नगराध्यक्ष नजमा तडवी, माजी सभापती राजू माळी, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, शिवराज पाटील, प्रवीण पाटील, वासुदेव बढे, विजय भंगाळे, प्रेमचंद बढे, भैया पाटील, जितेंद्र पाटील, बापू ससाणे, सुभाष पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !