माजी आमदार शिरीष चौधरींचा मतदारांशी संवाद
रावेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आदिवासी भागातील गाव, पाड्यांना भेटी दिल्या. मतदारांनी संधी दिल्यास संपूर्ण मतदारसंघाचा विकास करणार असल्याचे ग्वाही चौधरी यांनी आदिवासी बांधवांना दिली. आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून माजी आमदार शिरीष चौधरी प्रत्येक गावाला होम-टू-होम भेटी देत आहेत. त्यांनी आदिवासी भागातील जीन्सी, पाल, निमड्या, गारखेडा, आभोडा, लालमाती, सहस्रलिंग, कुसुंबा, मोरव्हाल, अहिरवाडीसह अनेक गावांना भेटी देऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मतदारांनीदेखील त्यांना पाठिंबा दर्शवला.