किसान रेलद्वारे 25 फेरींच्या माध्यमातून 3893 टन मालाची वाहतूक


भुसावळ : भारतातील पहिली किसान रेल्वे गाडी देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावत असून 7 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या गाडीने 17 ऑक्टोबरपर्यंतच्या 25 फेरीच्या माध्यमातून तीन 893 टन मालाची वाहतूक भुसावळ विभागातून केली. डाळिंब (अनार), कॅप्सिकम, हिरवी मिरची, आले, लिंबू, बर्फावरील मासे यासारख्या नाशवंत मालाची वाहतूक केली तसेच इतर वस्तूंची वाहतूकदेखील केली जात आहे.

या ठिकाणावरून वाहतूक
भुसावळ विभागातील देवळाली, नाशिक, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बर्‍हाणपूर आणि खंडवा या ठिकाणाहून मालाची वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेलला प्रतिसाद मिळत असून भुसावळ विभागातून 15 रोजी 209 टन वाहतूक तर 17 रोजी 200 टन मालाची वाहतूक ही करण्यात आली. कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक शक्य झाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !