सांगवीसह फैजपूरात उद्या शंखनाद मेळावा


फैजपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार, 4 रोजी यावल तालुक्यातील सांगवी बु.॥ व फैजपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘शंखनाद रावेर विधानसभा मेळावा 2019’ चे आयोजन करण्यात आले आहे.हिंगोणा-सावखेडा जिल्हा ळहषद गटाचा मेळावा सांगवीतील ज्योती विद्या मंदिरात सकाळी 10 वाजता तर न्हावी-बामणोद जिल्हा परीषद गट आणि फैजपूर शहराचा सुमंगल लौन, फैजपूर येथे दुपारी तीन वाजता होईल.

यांची राहणार मेळाव्यास उपस्थिती
या मेळाव्यास पालकमंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, नामदार हरीभाऊ जावळे, खासदार रक्षा खडसे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य डी.के.चौधरी, अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीना तडवी, जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे उपस्थित राहतील. मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व आघाड्या, शक्ती केंद्र प्रमुख, पेज प्रमुख, गट प्रमुख, बूथ प्रमुख, महिला प्रमुख, शहर प्रमुख उपस्थित राहतील. मस्त भाजप परीवारातील सदस्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन अवाहन यावल तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, सरचिटणीस उज्जैनसिंह राजपूत यांनी केले आहे.


कॉपी करू नका.