ग्रामसेवकाची आरपीआय तालुकाध्यक्षांकडून झपाई
रावेर पंचायत समितीतील प्रकार : ग्रामसेवक पैसे घेऊन काम करीत असल्याचा आरोप
रावेर : रावेर पंचायत समितीत गटविकास अधिकार्यांसमोर निरुळच्या ग्रामसेवकाची आरपीआयचे तालुकाध्यक्ष विक्की तायडे यांनी चांगलीच झपाई केली. ग्रामसेवक पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचा आरोप रीपाइंने केला. गाव पातळीवर बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे प्रात्यक्षिकच रावेर पंचायत समितीत गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्यासमोर पहायला मिळाले.
गटविकास अधिकार्यांची संरजमशाही
निरुळ येथील ग्रामसेवक धनराज सुरसे हे गावात आर्थिक देवाण-घेवाण करून इतरांचे अतिक्रमण कायम करतात परंतु आर्थिकदृष्टया मागास असलेले महिलांचे अतिक्रमण कायम करत नाही तसेच गावात नळ कनेक्शन देण्यासाठी ग्रामसेवक एक हजार रुपयाची मागणी करत असल्याचा आरोप महिलांनी केला. यावेळी गटविकास अधिकार्यांची सरजामशाही बघायला मिळाली. आलेल्या सर्व दलित महिला जमिनीवर गटविकास अधकिार्यांसमोर बसल्या मात्र साधी खुर्चीसुद्धा त्यांना बसण्यासाठी देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. यावेळी रीपाइं तालुकाध्यक्षांनी ग्रामसेवक काम करण्याचे पैसे मागतो असा आरोप करून ग्रामसेवकाची झपाई करीत असताना पंचायत समितीच्या आवारात बाहेरुन आलेले लोक गटविकास अधिकार्यांच्या दालनाबाहेर गर्दी करून सारा प्रकार पाहत होते. गटविकास अधिकारी मात्र हा प्रकार पाहत राहिल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी रीपाइं जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गाढे, सतीष निकम, राहुल लहासे, रवींद्र सईमिरे, भीमराव तायडे यांची उपस्थिती होती. अलका तायडे, सह्याबाई खैरे, अरुणा खैरे, रेखाबाई खैरे, बेबाबाई लहासे, रेखाबाई सईमीरे या वंचित लाभार्थीदेखील उपस्थित होते.
सर्व प्रकरणाची चौकशी करणार
निरुळ येथील ड च्या यादीची तसेच नळ कनक्शेन सोबत दलित वस्तीच्या कामांची चौकशी केली जाईल तसेच गावातील अतिक्रमण धारकांचा प्रश्न तत्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी सांगितले.

