अप-डाऊन गोंदिया रद्द तर वास्को दी गामाच्या मार्गात बदल


पुणे-मिरज विभागातील भिलवडी व नांद्रे दरम्यान रेल्वेची तांत्रिक कामे

भुसावळ : पुणे-मिरज विभागातील भिलवडी आणि नांद्रे स्थानकांदरम्यान किलोमीटर क्रमांक 258/00 ते 258/01 यामध्ये तांत्रिक काम केले जात असल्यामुळे काही गाड्या रद्द तर काहींचा मार्ग वळवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

गोदिंया एक्सप्रेस रद्द
डाऊन 01039 कोल्हापूर-गोंदिया विशेष गाडी प्रस्थान स्टेशनपासून 20 ते 23 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 01040 गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी प्रस्थान स्टेशनपासून 20 ते 22 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

वास्को दी गामाच्या मार्गात बदल
डाऊन 02779 वास्को दी गामा-हजरत निजामुद्दीन विशेष गाडी प्रस्थान स्टेशनपासून 20 ते 23 ऑक्टोबरदरम्यान मिरज-कुर्डूवाडी-दौंड मार्गे हजरत निजामुद्दीन स्टेशनला जाईल तर अप 02780 हजरत निजामुद्दीन ते वास्को दी गामा ही गाडी प्रस्थान स्टेशनपासून 19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान दौंड, कुर्डूवाडी, मिरजमार्गे हजरत निजामुद्दीन स्टेशनला जाईल.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !