भुसावळातील गँगमन खून प्रकरणी संशयीताची न्यायालयीन कोठडीत रवानगी
भुसावळ- एकेरी बोलल्याचा राग आल्याने भुसावळ मध्य रेल्वेत गँगमन असलेल्या पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे (35, गंगारॉम प्लॉट, भुसावळ) या तरुणाचा शुक्रवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास पेपर कटरने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी निलेश चंद्रकांत ताकदे (26, जुना सातारा, भुसावळ) यास गुन्ह्यानंतर अवघ्या तासाभरात अटक करण्यात आली होती. आरोपीला शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपीची पोलिस कोठडी संपल्याने त्यास पुन्हा मंगळवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड करीत आहेत.