अवैध वाळू वाहतूक : चार ट्रॅक्टर केले जप्त


रावेरात पोलिस प्रशासनाच्या कारवाईने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांच्या गोटात उडाली खळबळ

रावेर : रावेर-पाल रस्त्यावर पोलिस प्रशासनाने अवैधरी वाळूची वाहतूक करणार्‍या चार ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कारवाई करीत गुन्हा दाखल केल्याने अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पाल मंडळाधिकारी व तलाठ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

रावेर पोलिसात गुन्हा दाखल
अवैध वाळुने भरलेले चार ट्रॅक्टर-ट्रॉली 15 ऑक्टोबर रोजी रावेरच्या दिशेने निघाल्यानंतर रावेर-पाल रस्त्यावर सहस्त्रलिंग गावानजीक पोलिसांकडून कारावई करण्यात आली आहे. यात शंकर भील (पाल) यांचे ट्रॅक्टर (एम.एच.19 बी.जी.9828), सुनील राठोड यांचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर (गुलाबवाडी), नाना बारेला यांचे विना क्रमाकाचे ट्रॅक्टर (पाल), कैलास पवार यांचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर (गुलाबवाडी) असे एकूण चार ट्रॅक्टर-ट्रॉली पोलिस प्रशासनाने जप्त केले. अवैधरीत्या वाळूची वाहतूक कारवाई करणार्‍यांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाल मंडळाधिकारी तलाठ्यांचे दुर्लक्ष
मोठ्या प्रमाणात पाल येथून अवैध वाळुची वाहतुक होते परंतु याकडे मंडळ अधिकारी व तलाठी यांचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. पोलिस प्रशासनाने एकाचवेळी चार अवैध वाळुने भरलेले ट्रॅक्टर पकडले असल्याने अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !