ज्वारी चोरणार्‍या तिघा आरोपींना अटक


फैजपूर : यावल तालुक्यातील चिखली येथे ज्वारीची पोती चोरणार्‍या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा हजार पाचशे रुपयांची 13 पोती ज्वारी हस्तगत करण्यात आली. चिखली येथीलच जितेंद्र ब्रिजलाल पाटील, कृष्णा वना बादशाह व नितीन प्रवीण तायडे या तिघांना अटक करण्यात आली. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिखली येथील सोपान वासुदेव पाटील या शेतकर्‍याची 16 रोजी ज्वारी चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, गोकुळ तायडे, किरण चाटे, अनिल महाजन, महेश वंजारी, उमेश सानप यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !