भुसावळात खाजगी रुग्णालयात तोडफोडप्रकरणी गुन्हा


भुसावळ : किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकण्यात आल्यानंतर त्यास जामनेर रोडवरील डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात आणल्यानंतर त्यास मृत घोषित करण्यात आले होते तर याचा राग आल्याने शेख समीर याने हॉस्पिटलमधील काचेची तोडफोड करीत डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना 11 ऑक्टोबरला घडली होती. 11 ऑक्टोंबर रोजी पंचशील नगरातील रहिवासी मोहम्मद कैफ शेख जाकीर याच्या डोक्यात रॉड मारल्याने त्यास जखमी अवस्थेत डॉ.मानवतकर रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केल्याचा राग आल्याने शेख समीर शेख जाकीर याने डॉक्टरांना मारहाण करून शिवीगाळ केली तसेच काऊंटरवरील वरील मोठा काच फोडला. डॉ.राजेश मानवतकर यांनी येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून शेख समीरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहा.पोलिस निरीक्षक मंगेश गोठला, समाधान पाटील तपास करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !