अन् मोदींच्या भाषणावरील रीट्वीट खडसेंनी हटवले
पुणे : राष्ट्रवादी प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर केलेल रीट्वीट केले मात्र अवघ्या तासाभरात ते ट्वीट खडसे यांनी डिलीट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला. हेच ट्वीट ‘रीट्वीट’ करत खडसेंनी पक्षांतारचे स्पष्ट संकेत दिले होते तर अवघ्या तासाभरात खडसेंनी आपले ट्वीट हटवले आहे.

