माजी मंत्री एकनाथराव खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत करणार प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती : भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ : राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी खडसेंना प्रवेशासाठी दिल्या शुभेच्छा


जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे हे शुक्रवारी दुपारी दोन वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याची माहिती खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परीषदेत दिली. दरम्यान, खडसेंच्या भाजपाच्या राजीनाम्याने भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हेवी वेट नेते खडसे यांनी मोंदीवरच ट्विट केले होते तर नंतर ते डिलीटही केले त्यामुळे खडसे आता यापुढे आक्रमक पवित्रा घेवून नेमकी काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहेत.

शुक्रवारी होणार राष्ट्रवादीत प्रवेश
भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती परंतु त्यावेळी खडसे यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले होते. खडसे समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुक्ताईनगरातील फार्म हाऊसवर जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोषाचे वातावरण आहे.

खडसेंचे पक्षात स्वागत अ‍ॅड.रवींद्र पाटील
माजी मंत्री एकनाथरावख खडसे यांचे पक्षात स्वागत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी दिली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !