जनतेची भटकंती थांबणार : रावेर तहसीलमध्ये अ‍ॅफेडेव्हीट सुरू


नायब तहसीलदार संजय तायडे यांची माहिती

रावेर : तालुक्यातील विद्यार्थी, पालकांची तसेच सर्वसाधारण नागरीकांची भटकंती थांबणार असून रावेर तहसीलला अ‍ॅफेडेव्हीट (प्रतिज्ञापत्र) सुविधा उपलब्ध झाली असून गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांनी केले आहे. गेल्या एक वर्षापासून रावेर तहसीलमध्ये अ‍ॅफेडव्हीट बंद असल्याने नागरीकांची तसेच विद्यार्थी यांची शैक्षणिक कामांसाठी भटकंती करावी लागत होती शिवाय इतर पर्याय म्हणून नोटरी करावी लागत होती. आता रावेर तहसीलमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सातच्या दरम्यान निवासी नायब तहसीलदार यांच्या कक्षात अ‍ॅफेडेव्हीट (प्रतिज्ञापत्र) करून देण्यात येणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे म्हणाले.

महसूल वसुलीसाठी शेतकर्‍यांनी सहकार्य करावे
शासनाची शेतकर्‍यांकडे बाकी असलेले शेतसारा नजराणा व इतर सर्व प्रकारची बाकी जमा करावी तसेच शासनसुध्दा यासाठी शेतकर्‍यांना सहकार्य करते व आता विविध प्रकारची बाकी असल्यास कर भरण्याचे आवाहन निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !