रावेरात माजी मंत्री खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्वागत
रावेर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा घेतलेल्या निर्णयानंतर रावेरात ‘नाथाभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ’ अश्या घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, शहराध्यक्ष शेख महेमुद मण्यार, गणेश महाजन, योगेश पाटील, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष समाधान साबळे, माजी जिल्हा सरचिटणीस बबलूभाऊ सावंत व यावेळी राष्ट्रवादी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

