रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी यास्मिन मुसरत शेख
रावेर : रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी यास्मीन मुसरत शेख कलीम यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष निवडीसाठी पालिका सभागृहात तहसीलदार तथा पीठासन अधिकारी उषाराणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी यास्मिन कलीम यांचा उपनगराध्यक्ष निवडीसाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सहकार्य केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, मावळते उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन, गटनेते आसीफ मेंबर, अॅड.सुरज चौधरी, प्रल्हाद महाजन, शेख सादीक, जगदीश घेटे, प्रकाश अग्रवाल, नगरसेविका संगीता महाजन, ललिता बर्वे, हमीदाबी पठाण, संगीता वाणी आदी उपस्थित होते.

