माजी मंत्री एकनाथराव खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना


मुक्ताईनगर : भाजपापासून गेल्या चार वर्षांपासून डावलण्यात येत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली होती शिवा शुक्रवार, 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी दुपारी माजी मंत्री खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे, कन्या तथा जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर या देखील मुंबईला रवाना झाल्या आहेत.

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश अन भाजपाला हादरा
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने खान्देशासह विदर्भात अनेक राजकीय समीकरण भविष्यात बदललेली पहावयास मिळणार आहेत शिवाय भाजपा नेते एकनाथ खडसेंचे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंचे स्वागत करताना भाजपला पाया ठिसूळ होतोय याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे तर संजय राऊत यांनीही खडसेंच स्वागत करताना भाजपावर बाण चालवले आहेत. आता, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही भाजपा नेत्यांसाठी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, असे म्हणत मुश्रीफ यांनी आणखी नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकांपूर्वी भाजपात गेलेले तसेच काठावरचे अनेकजण राष्ट्रवादीत येतील, असा दावा मुश्रीफ यांनी केला. एकनाथ खडसेंमुळे खान्देशात पक्षाची ताकद वाढेल, त्यांचे राष्ट्रवादी पक्षात आनंदाने स्वागत, असेही मुश्रीफ यांनी म्हटलंय.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !