भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी केले माजी मंत्री खडसेंच्या प्रवेशाचे स्वागत


भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करीत असून या निर्णयाचे भुसावळातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे व नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांनी स्वागत केले आहे. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाची ताकद वाढणार असल्याचे नितीन धांडे म्हणाले. सोशल मिडीयावरही धांडे यांची खडसेंच्या स्वागताची पोस्ट व्हायरल झाली आहे.

अनेकांचा आज होणार राष्ट्रवादीत प्रवेश
खडसे समर्थक गुरुवारीच मुंबईत दाखल झाले असून तेदेखील शुक्रवारी खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. विद्यमान पदावर असलेले पदाधिकारी मात्र नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत जातील, असे संकेत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !