पहिल्या रांगेत बसणार्या खडसेंना भाजपाने शेवटच्या रांगेत बसवले
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील : खडसेंचा थोड्याच वेळेत राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश सोहळ्याला प्रारंभ झाला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करीत आहेत. खडसेंवर गेल्या चार वर्षांपासून अन्याय झाला. सभागृहात पहिल्या रांगेत बसणार्या नेत्याला भाजपाने शेवटच्या रांगेत बसवले, असेही ते म्हणाले. खडसेंवर सातत्याने अन्याय झाला व त्याबाबत मी सभागृहातदेखील सर्वाधिक मीच बोललो, असेही ते म्हणाले.
यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
प्रसंगी खडसेंसह माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, बोदवड मार्केट कमेटीचे सभापती निवृत्ती पाटील, कैलास सूर्यवंशी (चाळीसगाव), राजू माळी, भाजपा सरचिटणीस संदीप देशमुख, मधुकर राणे, मंदाताई खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

