चंद्रकांत दादा, कोल्हापूरात साधा पंचायत समिती सदस्य तरी निवडून आणता येतो का?
भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या टिकेला माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे उत्तर
मुंबई : कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का? असा सवालही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना केला आहे. भाजपामध्ये माझा छळ झाला. माझी बदनामी झाली. म्हणून मी पक्ष सोडला. काही मिळविण्यासाठी पक्ष सोडला नाही, असेही खडसेंनी प्रदेशाध्यक्षांच्या टिकेला उत्तर देताना सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या आरोपांना उत्तर दिले. खडसेंच्या समाधानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी? हे पाहावे लागेल, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधला होता.
खडसे म्हणाले, तुमचा भाजपाशी संबंध काय?
खडसे म्हणाले की, चंद्रकांतदादा, तुमचा भाजपाशी संबंध काय होता? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला आहात, अशी टीका माजी मंत्री खडसे यांनी केली आहे.


