सावद्यात रुग्णालयाची अज्ञातांकडून तोडफोड


सावदा : शहरातील गजानन हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता घडली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने कारवाईसाठी सावद्याचे सहा.निरीक्षक राहुल वाघ यांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहरातील डॉ.सुनील चौधरी यांचे गजानन हॉस्पिटल असून शुक्रवारी सकाळी ओडीपी सुरू असताना 28 वर्षीय तरुणाला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले असता त्यास पुढील उपचारासाठी मोठ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिल्यानंतर नातेवाईक रुग्णाला घेवून गेले व त्याच्या काही वेळातच 11.30 वाजता अज्ञात चार तरुणांनी हातातील टॉमी तसेच मोठे दगड हॉस्पिटलवर भिरकावत दरवाजा, खिडक्या तसेच स्वागत कक्षाचे काउंटरच्या टेबलावरील काचा फोडल्या तसेच रुग्णालयातील टीव्हीची तोड-फोड केली. सहा.निरीक्षक राहुल वाघ यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !