माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे राष्ट्रवादीत स्वागत : पक्षाची वाढणार ताकद
माजी आमदार संतोष चौधरींनी मांडली आपली भूमिका
भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात माझ्यात व खडसे यांच्यात राजकीय मतभेद होते, वैयक्तिक नाही. खडसे आता राष्ट्रवादीत आल्याने त्यांचे मनापासून मी स्वागत करतो. त्यांच्या येण्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असून भाजपातील विरोधक संपणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी केला आहे. ते म्हणाले की, आगामी पालिका निवडणुकीत भुसावळ पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असून पार्टीकडून मुंबईत उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने आपण गेलो व एकाच व्यासपीठावरही आल्याचे ते म्हणाले.
