भुसावळात डॉक्टरांना खंडणी मागणारा आरोपी जाळ्यात


भुसावळातील बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई : अन्य दोघा पसार आरोपींचाही कसून शोध

भुसावळ : डॉ.स्वप्नील राजाराम कोळंबे (38, रा.इंडीयन ऑईल पेट्रोल पंपाच्या बाजुला, जामनेर रोड, भुसावळ) यांना प्रती महिना 50 हजार रुपये प्रति महिना खंडणी मागितल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर दुसरा मुख्य आरोपी शेख कलिम (दीनदयाल नगर, भुसावळ) यास शनिवारी पहाटे एक वाजता फैजपूर-सावदा रस्त्यावरून गोपनीय माहितीवरून अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील चौघांपैकी दोघांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा कसून शोध सुरू आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक् दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोटला, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, किशोर महाजन, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, सचिन चौधरी, योगेश महाजन, सुभाष साबळे आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !