भुसावळात उद्या माजी मंत्री खडसेंचे राष्ट्रवादीकडून स्वागत


भुसावळ : भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे मुंबईहून शनिवारी जळगावात दाखल झाले. परतीच्या प्रवासात ठिकठिकाणी खडसेंचे राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी स्वागत केले तर रविवारी हे मुक्ताईनगरात परतत असून सकाळी 10 वाजता भुसावळात आल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांकडून स्वागत केले जाणार आहे. जामनेर रोडवरील अष्टभूजा देवी मंदिराजळ खडसे यांचे सकाळी 10 वाजता चारचाकीने आगमन झाल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, कृउबा सभापती सचिन संतोष चौधरी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वागत करणार आहेत. पदाधिकार्‍यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन धांडे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !