मुक्ताईनगरात भाजपा कार्यालयाला लागले टाळे


माजी मंत्री खडसे मुक्ताईनगरात दाखल झाल्यानंतर गजबजणार आता ‘ते’ कार्यालय

मुक्ताईनगर : भाजपाकडून सातत्याने डावलण्यात येत असलेले माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीचे घड्याळ शुक्रवारी मुंबईत मनगटावर बांधले व त्यांच्योसाबत निवडक कार्यकर्तेही राष्ट्रवादीत गेले तर लवकरच मोठा प्रवेश सोहळ्यात अनेक भाजपा पदाधिकारी राष्ट्रवादीत जाणार आहेत. दरम्यान, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मुक्ताईनगरात भाजपाला कार्यालयाला दोन दिवसांपासून टाळे लागले असून भाजपाचे बॅनर कार्यालयावरून हटवण्यात आले आहेत. खडसे रविवारी मुक्ताईनगरात परतल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू होईल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. जिल्हा बँकेच्या शाखेशेजारी हे कार्यालय असून अनेक वर्षांपासून भाजपा कार्यकर्त्याची नाळ या कार्यालयाशी जुळलेली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !