भुसावळात माजी महसूल मंत्री खडसेंचे राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांकडून जंगी स्वागत


भुसावळ : भाजपाला रामराम केलेले माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते रविवारी सकाळी भुसावळमार्गे मुक्ताईनगर येथे जात असताना त्यांचे शहरातील अष्टभूजा देवी मंदिराजवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी फटाक्यांचील जोरदार आतषबाजी करीत त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी खडसे यांचे बुके देवून स्वागत केले तर त्यांच्या सुविद्य पत्नी व नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांनी जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांचे स्वागत केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे, अर्जुन सपकाळे, अशोक चौधरी, भागवत सावकारे, पुंडलिक पाटील, दुर्गेश ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही खडसेंचे स्वागत केले. शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन चालणार असल्याचे खडसे म्हणाले. दरम्यान, खडसेंसह पदाधिकार्‍यांचा ताफा दाखल होताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !