माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे चाळीसगावात तालुक्यातील पदाधिकार्‍यांकडूनही स्वागत


राजीवदादा युवा विचार मंचतर्फे करण्यात आला सत्कार

चाळीसगाव : राज्याचे माजी महसूलमंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मुंबई येथे देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथराव खडसे यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.

राजीवदादा युवा विचार मंचच्या वतीनेही स्वागत
शनिवार, 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता मुंबई येथील पक्ष कार्यालय येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर एकनाथ खडसे यांनी घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कल्याण फाटा, पडघा, शहापूर, कसारा, इगतपुरी, घोटी, नाशिक, ओझर, पिंपळगाव, चांदवड, मालेगाव येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. यावेळी धुळे राज्य महामार्गावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या चेअरमन अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांचे चाळीसगाव तालुक्यातील राजीवदादा युवा विचार मंचच्या वतीने स्वागत करण्यात आले. तदनंतर पुढील मार्गावरील पारोळा, एरंडोल मार्गे जळगांवकडे एकनाथराव खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रयाण केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !