मुक्ताईनगरातही माजी मंत्री खडसेंचे स्वागत
मुक्ताईनगर : भाजपाला सोडचिठ्ठी दिलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे रविवारी दुपारी मुक्ताईनगरात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. श्री क्षेत्र कोथळी येथील निवासस्थानी पत्नी मंदाकिनी खडसे व भाजपा खासदार तथा स्नुषा रक्षा खडसे यांनी त्यांचे औक्षण केले. दरम्यान, मुक्ताईनगर शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही खडसें यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुका अध्यक्ष यु.डी.पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष ईश्वर राहणे, शाहिदखान, कल्याण पाटील, पं.स.चे माजी सदस्य किशोर चौधरी, साहेबराव सिंगतकर, विजय सोनार, प्रवीण पाटील उपस्थित होते. तत्पूर्वी प्रवर्तन चौकात राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.

