भुसावळात अल्पवयीन मुलींची छेडखानी : आरोपी जाळ्यात


भुसावळ : अल्पवयीन मुलींची छेडखानी केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यातील दोघा आरोपींच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राज मोहन पवार (21) व रीतीक विजय शेटे (19, दोघे रा.वाल्मिक नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याने त्यांच्याविरुद्ध 23 रोजी पहाटे तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोटंला, समाधान पाटील, रमण सुरळकर, किशोर महाजन, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, योगेश महाजन, सुभाष साबळे आदींच्या पथकाने केली. पुढील तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला , योगेश महाजन करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !