वरणगावचे सुनील काळे यांना ‘बेस्ट नगराध्यक्ष पुरस्कार 2020’ जाहीर


वरणगाव : विकासकामांचे व्हिजन व अल्पावधीत वरणगाव शहरात केलेल्या विविधांगी विकासकामांची दखल घेत वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना ‘बेस्ट नगराध्यक्ष पुरस्कार 2020’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील निवड झालेले काळे एकमात्र आहेत. सत्ता संघर्षंचे मुख्य संपादक प्रकाश साळवे व सिद्धीनाथ मेटे यांच्या समितीतर्फे हा पुरस्कार दिला जाणार आहे.

अडीच वर्षात विविधांगी विकासकामे
वरणगाव शहरात नगराध्यक्ष पदावर असताना सुनील काळे यांनी अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून वरणगाव शहरासाठी 70 कोटींचा विकास निधी खेचून आणला होता. त्याशिवाय वरणगाव शहराला 24 तास पाणी मिळण्यासाठी 25 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणण्यात आली, सार्वजनिक शौचालय, गावात काँक्रीटीकरणासह डांबरीकरणाचे व पेव्हर ब्लॉक रस्ते, हनुमान व्यायाम शाळा, अत्याधुनिक प्रशस्त ग्रंथालय, व्यापारी संकुल, स्वामी सार्थ मंदिर सभागृह यां शिवाय विविधांगी विकासात्मक कामे काळे यांनी केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुनील काळे यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. लवकरच पुरुस्काराचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !