भुसावळात पत्रकार स्व.शेख सत्तार यांना वाहिली श्रद्धांजली


भुसावळ : दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शेख सत्तार यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाल्यानंतर त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलात बुधवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक श्रीकांत जोशी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, रोटरी क्लबचे ठाकूर आणि श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे पीआरओ निलेश वाणी यांनी यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून सत्तार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भविष्यात पत्रकारांच्या कुटुंबावर अशी वेळ येउ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सर्वानुमते सूचना करण्यात आली. सत्तार यांच्या कुटूंबाच्या दुखा:त सहभागी होउन शक्यती मदत करण्याचे ठरविण्यात आले. समाजाला न्याय देण्यासाठी धडपडणार्‍या पत्रकारांच्या परीवाराला पाठबळ कोणाचे ? असाही प्रश्न उपस्थित झाला. यावेळी प्रेम परदेशी, निलेश गोरे, नेवे, किशोर शिंपी, आशिष पाटील, शंतनु गचके, उदय जोशी, उज्ज्वला बागूल, सतीश कांबळे, संतोष शेलोडे, कलिम पायलट, गणेश वाघ आदी मुद्रण माध्यमाचे प्रतिनिधी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !