भुसावळात अल्पवयीन मुलीची छेडखानी : आरोपीला अटक
भुसावळ : अल्पवयीन मुलीच्या छेडखानी प्रकरणी बाजारपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यात पसार आरोपीला 25 रोजी मध्यरात्री चाळीसगाव परीसरातून अटक करण्यात आली. कैफ खान सलीम सलीम खान उर्फ कानपुरी (18, रा.नसरवांजी फाईल, सैलानी बाबा दर्गाजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोटला, समाधान पाटील, रमण सुरळकर, किशोर महाजन, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, योगेश महाजन, सुभाष साबळे आदींनी केली. तपास सहा.पोलिस अनिल मोरे, समाधान पाटील करीत आहेत.

